तुम्ही किती प्लास्टिक खात आहात?

खालील लेख या मूळ लेखापासून मराठीत अनुवादित केला गेला आहे

एका माणूस आयुष्यभर सरासरी २० किलोग्रॅम प्लास्टिक खात असू शकतो

आज जेवायला काय आहे? वरण, पोळ्या, आलू मटर, पनीर मसाला आणि PVC पाईप?

हि उदाहरणे तुम्हाला अति टोकाची वाटत असतील पण जर तुम्ही काही वेळ एखादी व्यक्तीचे जेवणाचे निरीक्षण केले तर एवढेच प्लास्टिक आपल्या जेवणात दैनंदिनी सूक्ष्म रूपात खात आहोत अशे लक्ष्यात येईल

२०१९ मध्ये WWF आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या अध्ययनात आढळले कि दर आठवड्याला एका क्रेडिट कार्ड एवढे प्लास्टिक आपल्या जेवणात मायक्रोप्लास्टिकच्या रूपाने आपल्या शरीरात जात आहे. हे प्लास्टिक मुख्यतः पाण्याच्या बाटल्यां द्वारे किंवा खेकड्या सारख्या खाद्याचा माध्यमाने शरीरात प्रवेश करत आहे.

रिऊटर्स च्या पत्रकारांनी वरील माहिती वरून खालील चित्रांच्या माध्यमातून आपल्याला मायक्रोप्लास्टिकच्या संकटाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

प्लास्टिक 0.7 ग्राम: एका दिवसात खाता येईल एवढे प्लास्टिक

प्लास्टिक बटण ५ ग्राम. एका आठवड्यात खाता येईल एवढे प्लास्टिक

प्लास्टिक कार्ड ७ ग्राम. १० दिवसात खाता येईल एवढे प्लास्टिक

प्लास्टिक लेगो विटा २२ ग्राम. १ महिन्यात खाता येईल एवढे प्लास्टिक

प्लास्टिक खेळण्यातले मणी १२५ ग्राम. ६ महिन्यात खाता येईल एवढे प्लास्टिक

प्लास्टिक हेल्मेट २४८ ग्राम. १ वर्षात खाता येईल एवढे प्लास्टिक

प्लास्टिक pvc पाईप १ किलोग्रॅम. ४ वर्षात खाता येईल एवढे प्लास्टिक

३ किलोग्रॅम प्लास्टिक. १० वर्षात खाता येईल एवढे प्लास्टिक

६.८ किलोग्रॅम प्लास्टिक. २७ वर्षात खाता येईल एवढे प्लास्टिक